पी.व्ही.पी.आय. टी.मध्ये ऑनलाईन परिसंवाद पूर्ण.
‘कोविड’ महामारीनंतरची स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील आव्हाने, संधि व उदयोन्मुख स्थापत्य अभियंत्याना आत्मसात करावी लागणारी कौशल्ये’ : या विषयसंदर्भात माजी विद्यार्थ्यांचे अनमोल मार्गदर्शन.
सांगली येथील पदमभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि बुधगाव ,सांगली येथे विध्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीकोनातून महाविद्यालयाच्या माजी विध्यार्थ्यांच्या सहकार्याने व कॉलेज व्यवस्थापन समिती तसेच स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या मार्गदर्शन खाली एक आठवड्याचा ऑनलाईन परिसंवाद आयोजित करण्यात आला.या परिसंवादास वसंतदादा शेतकरी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. विशालदादा पाटील,विश्वस्त मा.श्री.अमितदादा पाटील
श्री.पी.एल. रजपूत सर, साचिव, मा श्री. आदिनाथ मगदुम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या परिसंवादात कोविड-१९ च्या महामारीनंतरची आव्हाने व संधी, अद्ययावत कौशल्य, व्यवसाय निर्मिती या विषयावर मार्गदर्शन झाले.या अंतर्गत विध्यार्थी व अध्यापक वर्गाला स्थापत्य विभागातील विविध उच्य पदस्थ, नामवंत व्यावसाईक ,महामारी परिस्थितीत प्रत्यक्ष मदत कार्यात सहभागी शासकीय अभियंते अशा माजी विध्यार्थ्यानी विवेचन केले. यात मुख्यत्वे अभियंत्यांना भविष्यात मिळणाऱ्या संधी, सुविधा, अंगीकृत करावी लागणारी कौशल्ये, नोकरी, नवीन व्यवसाय , उत्तम व्यावसाईक कसे बनावे ? अशा अनेक विषयांवर समुपदेशन करण्यात आले. हा परिसंवाद ऑनलाईन पद्धतीने निशुल्क तत्वावर दि. २५ ते २९ मे २०२० दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या मध्ये सिव्हील विभागातील सर्व विध्यार्थी, अध्यापक, इतर महाविद्यालयातील विध्यार्थी,अध्यापक इतर माजी विध्यार्थी महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील स्टाफ, अशा एकूण ४१० प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला व लाभ घेतला.
या प्रसंगी श्री तेजराज पाटील – तेजराज प्रमोटर्स व बिल्डर्स पुणे, श्री सचिन संकपाळ, शिव कन्स्ट्रक्शन व शिवम बिल्डर्स, सांगली,
श्री. सुधीर गायकवाड – कार्यकारी अभियंता ठाणे महानगरपालिका , श्री राजेश जाधव – निवासी अभियंता बहुराष्ट्रीय कंपनी लूइस बर्गर, श्री अनिल अंकलगी – सहा. मुख्य अभियंता म्हाडा मुंबई,
यांचा झूम अँप व युट्युब द्वारे दररोज सुमारे दोनतास वार्तालाप झाला. या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये विध्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रश्न व शंकांचे वक्त्यांच्यासमर्पक उत्तराने समाधान झाले. ऑनलाईन प्रवेश व उपस्थिती नोंदवत सर्व समाविष्ट प्रशिक्षणार्थाना इ-मेल प्रणालीद्वारे प्रमाणपत्रे पाठवण्यात आली.विद्यार्थी केंद्रबिंदू मानून पूर्णपणे माजी विध्यार्थी समाविष्ट या आयोजित कार्यशाळेचे (परिसंवादाचे)सर्वदूर कौतुक होत आहे. कोरोनासंक्रमीत लॉकडॉन काळातील सर्व नियमांचे तंतोतंत पालन करीत हि संगणकीय (वेबिनार) प्रणाली पूर्ण केली असलेने महाविद्यालयाचे कार्य कौतुकपत्रच आहे. व्यवस्थापनाच्या सहकार्याने संस्थेचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.व्ही.टी.गायकवाड यांच्या नियोजनात हा परिसंवाद यशस्वी झाला. या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. एम .व्ही. नागेंद्र व इतर सहकारी प्रा. सौ. रेश्मा कराड ,प्रा. एस . ए. पाटील, प्रा.एम. बी, पेंढारी, व प्रा. व्ही. जी. सावंत यांच्या परिश्रमातून झाले.
या आणि अशा अनेक वैविध्य पूर्ण, रचनात्मक ,सकारात्मक शिक्षण प्रणाली साठी सुप्रसिद्ध पी.व्ही.पी.आय. टी. नेहमीच अग्रेसर आहे.
Thank you for reading!